Pimpri : महापौर राहुल जाधव जाणार ऑस्ट्रेलिया दौ-यावर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया देशाच्या दौ-यावर जाणार आहेत. ऑस्ट्रेलियात 7 ते 10 जुलै दरम्यान होणा-या अशिया पॅसिफिक शहराच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या परदेश दौ-यासाठी येणा-या चार लाख 80 हजार रुपयांच्या खर्चाच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली. 

जागतिक दर्जाचे वक्ते, नेटवर्कींगमधील संधी तसेच ध्येयनिष्ठव्यवसाय आखून शहरे गतीमान बनविणे, शहरांची स्थिरता, गतीशीलता, नवनिर्माण करण्याची क्षमता याबद्दल परिषदेत मार्गदर्शन केले जाणार आहे. महानगर निर्मितीच्या अभ्यासाच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड शहराला याचा फायदा होणार आहे. परिपूर्ण विकासाचा टप्पा गाठत असलेल्या शहराचे प्रतिनिधित्वकरणे, स्पॉन्सरशिपच्या संधीतून शहराला उपयोग करून देण्याबरोबरच नवीन पार्टनरशीप आणि समन्वय प्रस्थापित करण्यासाठी या परिषदेत सहभागी होणे आवश्‍यक आहे. 7 ते 10 जुलैदरम्यान ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन येथे आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत 100 शहरांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या दौ-याकरिता व्हिसा, विमान प्रवास, निवास, नाश्‍ता, भोजन, स्थानिक प्रवास व इतर खर्चासाठी निगडीतील मेसर्स व्हिजन हॉलिडेज या ठेकेदार संस्थेकडून सर्व नियोजन केले जाणार आहे. त्याकरिता येणा-या चार लाख 80 हजार रुपयांच्या खर्चाच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like