Pimpri News: कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करा – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करावे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून त्यांचे लसीकरण करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे यांनी अधिका-यांना दिल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारती मध्ये मनपा स्तरीय लसीकरण टास्क फोर्स समितीची बैठक महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन खाडे, महापालिका रुग्णालयांचे सर्व ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, शहरातील 18 वर्षावरील विद्यार्थी, पालक, बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे बांधकाम मजूर, भाजी विक्रेते, कागद कचरा गोळा करणारे कामगार, झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक, मोठ्या गृहनिर्माण संस्थेमधील नगरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता सर्व्हेक्षण करणे, लसीकरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, लसीकरण केंद्रे वाढविणे, लसीकरणाचा वेग वाढविणे या संदर्भात वैद्यकीय विभागाने तातडीने कार्यवाही करावी.

तसेच राज्य शासनामार्फत चालू असलेल्या मिशन कवच कुंडल मोहिमे अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरामधील नागरिकांनी कोविड-19 लसीकरण करून घेण्याचे महापौर ढोरे यांनी आवाहन केले. सर्व्हेक्षण व लसीकरणाकरीता महापालिकेतर्फे अधिक मनुष्यबळ व रुग्णवाहिका वैद्यकीय विभागास देण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांचे लसीकरण वेगाने होण्यास मदत होईल असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.