Pimpri : म्हेत्रेवाडीत महापौरांचा नागरी सत्कार

एमपीसी न्यूज – महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे व माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांच्या वतीने म्हेत्रेवाडी येथे महापौर राहुल जाधव यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव वह्या व तुळशी रोप देऊन करण्यात आला. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते श्रीराम हौसिंग सोसायटीतील रस्त्याच्या क्रॉंक्रीटीकरणाचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विकास आराखड्यातील रस्त्यांसह चोवीस तास पाणी योजनेला गती देण्याची ग्वाही महापौर जाधव यांनी दिली.

शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केले. क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, शिक्षण समितीच्या उपाध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेविका साधना मळेकर, अश्‍विनी जाधव, नगरसेवक सागर गवळी, स्वीकृत सदस्य संतोष मोरे, दिनेश यादव, पांडुरंग भालेकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.