Talegaon Dabhade : अर्थसंकल्प परस्पर मंजूर करण्याचा नगराध्यक्षाचा डाव !

विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

एमपीसी न्यूजतळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या 140 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच तुटीच्या अर्थसंकल्पाचे सादर करण्यात येणार आहे. प्रशासकीय कामकाजाचा लेखाजोखा सभागृहातील सदस्यांना विश्वासात घेता परस्पर मंजूर करण्याचा डाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी आखला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते, जनसेवा विकास समिती तळेगाव शहर विकास समितीच्या वतीने  संयुक्त पत्रकार परिषदे घेऊन करण्यात आलातसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभाऑनलाइन घेता सभागृहात घेण्यात यावी. अशी मागणी देखील यावेळी करण्यात अली

तळेगाव शहर विकास सुधारणा समितीचे गटनेते किशोर भेगडे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, जनसेवा विकास समितीचे गणेश खांडगे  हे या पत्रकार परिषदेतला उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी येथे गुरुवारी 17 डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन ऑनलाईन केलेले असून त्यावर आक्षेप घेत ही सभा सभागृहातच व्हावी अशी आग्रही मागणी  यावेळी करण्यात अली.  यापूर्वी कोरोनाच्या काळात देखील अनेक सभांचे आयोजन सुरक्षित अंतर ठेऊन शासकीय अधिकारी व नगराध्यक्षांनी पार पाडले आहेत.

या १७ तारखेच्या सभेत एकूण  107 विषयांचा समावेश करण्यात आलेला असून त्यातील सर्वच विषय जनहिताचे असल्याने त्यावर लोकप्रतिनिधींसह सर्वांची सभागृहात खुली चर्चा होणे गरजेचे आहे असे  भेगडे यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी हि होणारी सभा ऑनलाइन’ न घेता ती नगरपरिषदेच्या सभागृहात घेण्यात यावी. अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही. जनहित महत्त्वाचे आहे. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. नगराध्यक्षांना सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यास कोरोनाची भीती वाटत नाही, मात्र नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विकासाभिमुख विषयावर सभागृहात चर्चा करण्यासाठी कोरोनाची भीती वाटते. यामागे काहीतरी काळेबेरे आहे. असा आरोप

किशोर भेगडे यांनी केला.

सभागृहात चर्चा न करता अशा पद्धतीने आर्थिक कामकाजांना मंजुरी दिली गेली तर तळेगाव शहराचा विकास 50 वर्षे मागे जाईल नागरिकांना त्यांनी भरलेल्या पैशाचा विनियोग कसा केला जातो आहे हे  जाणण्याचा अधिकार आणि नेमके नगराध्यक्षा जगनाडे तेच डावलून दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.  असा आरोप गणेश काकडे यांनी केला.

नगरसदस्यांना विश्वासात न घेता ही सभा आॅनलाईन घेण्यात येत आहे. कोरानाच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा कुटील डाव करू पाहत आहेत; मात्र हा कुटील डाव साध्य होऊ देणार नाही.  असे गणेश खांडगे यांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.