Talegaon Dabhade : भाजप शहाराध्यक्षांच्या ‘त्या’ नोटिशीला नगराध्यक्षांचे ‘उत्तर’

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे पक्षाच्या नगरसेवकांसोबत समन्वयाने काम करत नाहीत, असा ठपका ठेवत तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी जगनाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला नगराध्यक्षांनी उत्तर दिले आहे. ‘मी पक्षाची हानी व निंदा होईल असे वर्तन केले नाही’ असे उत्तरात नगराध्यक्षांनी म्हटले आहे. तसेच आपल्या पत्राचा पक्षाने फेर विचार करावा, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी (दि.10) रोजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना पक्ष शिस्त भंगाची नोटीस पाठविली होती. त्याचा खुलासा जगनाडे यांनी (दि.15) रोजी केला आहे.

माने यांनी नगराध्यक्षा जगनाडे या निवडून आल्या पासूनच पक्षाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मनमानी कारभार करत आहेत. तसेच पक्षाच्या नगरसेवक, नगरसेविका यांच्याशी कोणताही समन्वय त्यांनी ठेवला नाही. तसेच गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत चालली आहे आदि आरोप करून तीन दिवसात लेखी उत्तर द्यावे. अन्यथा पदाचा राजीनामा देऊन शिस्त भांगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असे पत्र दिले होते.

या पत्राला नगराध्यक्षा जगनाडे उत्तर देताना म्हणाल्या आहे की, मी पक्षाची हानी व निंदा होईल असे कोणतेही गैर वर्तन केले नाही. कामकाज करत असताना विरोधक विरोध करत असतातच त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही. तसेच प्रशासकीय कामकाजातील काही निर्णय हे सर्वांना पटतातच असे नाही.याशिवाय भविष्य काळात पक्ष संघटना बदनाम होईल असे काही होणार नसल्याचे सांगून आपल्या पत्राचा फेर विचार करावा. असे पत्रात नमूद केले आहे.

नगराध्यक्षाच्या आलेल्या  खुलाशाच्या पत्रा बाबत माने यांना विचारले असता ते म्हणाले कि, हे पत्र पक्षाच्या कार्ड कमिटी समोर ठेवण्यात येईल आणि त्याबाबत निर्णय होईल असेही माने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.