Pimpri: ‘मी पिंपरी-चिंचवडकर’, ‘प्रशासनाला सहकार्य करणार, कोरोनाला हद्दपार करणार’, सोशल मीडियावर मोहीम

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरबाबत जनतेमध्ये आता मोठ्या प्रमाणात जनजागृती होवू लागली आहे. त्यासाठी काही संघटनांनी घरात बसूनच आता पुढाकार घ्यायला सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या विरोधात शहरामध्ये ‘मी पिंपरी-चिंचवडकर’, ‘प्रशासनाला सहकार्य करणार, कोरोनाला हद्दपार करणार’ ही टॅगलाईन घेवून सोशल मीडियावर मोहिम राबविली जात आहे. व्हॉट्सअॅप डीपी, स्टेटस्, फेसबुकवर या बाबतचे फोटो झळकत आहेत. या मोहिमेचे कौतुक केले जात आहे.

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाना भारतात देखील मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. महाराष्ट्रसह पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन आहे. तसेच संचारबंदी देखील लागू केली आहे. यामुळे नागरिक घरात बसून आहेत. सर्वांपासून अलिप्त राहणे आणि स्वत:ची काळजी घेणे या दोन प्रमुख उपाययोजना प्रत्येकाने केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याबाबत महापालिकेकडून जनजागृती केली जात आहे. नागरिका आता कोरोनाला गांभीर्याने घेत आहेत. घरी राहण्यास पंसती देताना दिसून येत आहे.

महापालिकेकडून देखील प्रभावी उपाययोजना केला जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून मागील आठ दिवसांपासून शहरात एकही कोरोनाचा नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला नाही. तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पाच रुग्णांचे पहिले रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आले असून ते पण कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.

नागरिकांमध्ये त्याबाबत जनजागृती झाली आहे. शहरातील नागरिकांनी ‘मी पिंपरी-चिंचवडकर’ ही सोशल मीडियावर मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘प्रशासनाला सहकार्य करणार, कोरोनाला हद्दपार करणार’ या आशयाचे संदेश व्हायरल केले जात आहेत. सोशलमिडीयावरील या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ‘मी पिंपरी-चिंचवडकर’, ‘प्रशासनाला सहकार्य करणार, कोरोनाला हद्दपार करणार’ या संदेशाचे नागरिक आपले व्हॉट्सअॅप डीपी, स्टेटस्, फेसबुकवर टाकत असल्याचे दिसून येतात. या मोहिमेचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.