BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सिम्बॉयोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन्स ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – विमाननगर येथील सिम्बॉयोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन्स मधील आजी माजी 10 विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली. त्यामुळे लैंगिक शोषणाचा प्रकार आता शैक्षणिक क्षेत्रात होत असल्याचे समोर आले आहे.

‘मी टू’ ही चळवळ महिलांवर होणा-या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लैंगिक शोषणाचे आणखी एक उदाहरण आता ‘मी टू’ या चळवळीतून समोर आले आहे. आता यामध्ये कॉलेजातल्या तरूणी देखील पीडित होत असल्याने शिक्षणक्षेत्र देखील बदनाम होत आहे.

नुकताच पुण्यातील सिम्बॉयोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन्स मधील ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत विद्यार्थिनी सोबत होणा-या लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून 10 आजी माजी विद्यार्थिनींनी अन्यायाला वाचा फोडली आहे. ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत त्यांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला जगासमोर आणले आहे. ‘मी टू’ द्वारे मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रातील काही महिलांनी त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचे उघड केल्याने देशभरात खळबळ माजली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या तक्रारीनंतर सिम्बॉयोसिस प्रशासनाने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर केलेल्या खुलाशामध्ये महाविद्यालयाचा परिसर लैंगिक शोषणमुक्त रहावा यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याचे म्हटले आहे. तसेच सिम्बॉयोसिस प्रशासनाने माफीनामा सादर करत याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झालेले आहे, त्यांनी पुढे येऊन या घटनेच्या तपासासाठी नेमलेल्या समितीसमोर येऊन तक्रारी द्याव्यात असे आवाहन केले आहे..

याबाबत सिम्बॉयोसिसच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर यांनी यावर बोलताना विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या या तक्रारी आम्ही वाचत असून या तक्रारींकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत. आज सकाळीच सिम्बॉयोसिसच्या उच्चस्तरीय कमिटीने तातडीने बैठक घेऊन या तक्रारींची दखल घेतली. विद्यापीठाची अंतर्गत समिती या तक्रारींबाबत पाऊले उचलत असून आज दुपारी एक बैठक होणार आहे त्यात सर्व तक्रारींच्या तपासाबाबत चर्चा करण्यात येणार आहे असे सांगितले.

.

HB_POST_END_FTR-A1
.