Pimpri News: …तर गोवर रोग टाळता येतो – डॉ. पवन साळवे

एमपीसी न्यूज – संसर्गजन्य आजारांमध्ये गोवर हा आजार प्रथम क्रमांकावर येत असून अस्वच्छतेमुळे झोपडपट्ट्यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये आढळून येतो. त्यामुळे प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 9 महिने पूर्ण ते 12 महिने व दुसरा डोस 16 ते 24 महिने या वयोगटात असताना लहान मुलांना देण्यात येतो. या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

चिखली-कुदळवाडीसह शहरात गोवरच्या संशियत रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्या पुढाकाराने कुदळवाडी परिसरातील डॉक्टरांसाठी गोवर आजाराच्या उपाय योजनांसाठी शुक्रवारी (दि.25) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आकुर्डी रुग्णालयाचे जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, दिनेश यादव, डॉ. राहुल साळुंखे, कुदळवाडीतील डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Theft News: बसमध्ये चढताना दागिने चोरणारा रंगेहात अटकेत

डॉ. पवन साळवे म्हणाले, सध्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. हवेमध्ये वाढ झालेल्या उष्णतेमुळे हा संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच संसर्गजन्य आजारांमध्ये गोवर हा आजार प्रथम क्रमांकावर येत असून अस्वच्छतेमुळे झोपडपट्ट्यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. तसेच सर्दी, खोकला झालेले असताना जर मुलं बाहेर खेळण्यास गेले आणि इतर मुलांमध्ये जाऊन ते शिंकले किंवा खोकले तर संसर्ग अधिक लवकर पसरतो. कारण या आजाराचे जंतू हे हवेत साधारण 2 तास असतात. डॉक्टरांनी मुलांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करावी. सर्व्हेक्षण करुन संशयित लक्षणं असणाऱ्या मुलांवर लक्ष ठेऊन पालिकेच्या आरोग्य विभागाला कळवावे, अशा सूचना डॉ. साळवे उपस्थित डॉक्टरांना केल्या.

गोवरची लक्षणे!

ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, गोवरची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.