Medical Exam News : कोरोना इफेक्ट ! मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलल्या,जूनमध्ये होणार परीक्षा

एमपीसीन्यूज : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

अमित देशमुख यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली. येत्या 19 एप्रिलपासून वैद्यकीय परीक्षा सुरु होणार होत्या. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आता या परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि अन्य विद्यार्थी संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर मंत्री अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील 72  तासांत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.  परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.

अमित देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.

या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे”.

 

सद्यस्थितीत 450 पेक्षा अधिक विद्यार्थी कोरोनाग्रस्त आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागेल अशी दुर्दैवी परिस्थिती तयार झाली आहे. शिवाय कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षेबाबत भीती निर्माण झाली होती. कोरोनाची लक्षणे असतांना सुद्धा परिक्षेपासून वंचित राहू नये यासाठी अनेक विद्यार्थी चाचणी करण्यास घाबरत आहेत. त्यांच्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संक्रमण होण्याची दाट शक्यता असल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत.

यश दत्तकाका साने : शहराध्यक्ष -राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पिंपरी चिंचवड

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.