Dehuroad : मेडिकल दुकान फोडून रोकड पळवली

एमपीसी न्यूज – मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून तीन हजार रुपयांची रोकड पळवून नेली. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी जय गणेश हेरिटेज किवळे येथे उघडकीस आली.

सचिन भाऊसाहेब कोलते (वय 30, रा. विकासनगर, किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन कोलते यांचे केवळे मधील जय गणेश हेरिटेज येथे पुरंदर मेडिकल दुकान आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी मेडिकल कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी मेडिकल दुकानाचे शटर उचकटून मेडिकलमध्ये प्रवेश केला. दुकानातून तीन हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.