Pune : मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे इमर्जन्सी मेडिसिन डे निमित्त जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज  : जागतिक आपत्कालीन औषध दिनानिमीत्त मेडिकव्हर हॉस्पिटल पुणे (Pune) यांच्या तर्फे ट्रॅफिक सिग्नलवर आपत्कालीन व्यवस्थापन आणि ट्रॉमा जनजागृती अभियान २७ मे रोजी राबवण्यात आले.  या जनजागृती अभियानात शहरातील प्रमुख ट्रॅफिक सिग्नल चौकांवर जमा झालेल्या समुदायाचा उत्साही सहभाग दिसला.

Pune : यशदामध्ये सेवोत्तम या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद

आपत्कालीन घटना हि अनपेक्षित घटना आहे, ज्याचा व्यक्ती आणि समुदायांवर खोलवर परिणाम होऊ शकतो. नैसर्गिक आपत्ती, गंभीर अपघात , वैद्यकीय संकट अथवा एखादी दुखापतग्रस्त घटना असो, त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. या आपत्कालीन परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी ज्ञान, कौशल्ये आणि संसाधनांचा योग्य वापराबाबत माहिती असल्यास जीव वाचवण्‍यात आणि मनुष्यहानी कमी करण्‍यास मदत होऊ शकते.

मेडीकव्हर हॉस्पिटल च्या कर्मचार्‍यांनी विविध ट्रॅफिक सिग्नलवर हातात फलक धरून, सुरक्षिततेच्या घोषणा आणि आपत्कालीन व्यवस्थापन जागरूकता संदेश प्रभावीपणे वाहनचालकांना कळावेत म्हणून मोठ्या उत्साहात हा जनजगृती अभियान राबवला. यावेळी सर्व हेल्मेट धारकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांची प्रशंसा करण्यात आली व इतर लोकांना याच प्रमाणे प्रेरित करण्याचे आवाहन करण्यात आले.

राजीव भावसार (आरोग्य मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष), पुणे (Pune) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “सुरक्षा ही एक सामाजिक जबाबदारी आहे जी प्रत्येक व्यक्तीपासून सुरू होते. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्वतःला शिक्षित करून, आपण केवळ स्वतःचेच नव्हे तर आपल्या देशाच्या नागरिकांचे जीवनाचे रक्षण करण्यासाठी स्वतःला सुसज्ज करायला हवे. संकटाच्या वेळी, प्रत्येक सेकंदाला महत्त्व असते, चला एकत्र, मजबूत, संघटित आणि आपल्या मार्गावर येणा-या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असा समुदाय आपण तयार करूया.”

डॉ., व्यास मौर्या (कन्सल्टंट इमर्जन्सी मेडिसीन) बाबत म्हणाले, “आपत्कालीन परिस्थिती हि कोणाला कधीही आणि कोठेही उद्भवू शकते . तत्परतेची मानसिकता स्वीकारून आणि आपत्कालीन परिस्थितीची गाभीरता समजून आपण धैर्याने, योग्यतेने आणि करुणेने तोंड दिले पाहिजे.

सुरक्षितता आणि सज्जतेची संस्कृती वाढवण्यासाठी अथक परिश्रम करत असताना आरोग्यसेवा जागरूकता आणि सामुदायिक सहभागामध्ये मेडीकव्हर अग्रेसर आहे. जागतिक आपत्ती दिनासारख्या उपक्रमांद्वारे, आपत्कालीन परिस्थितीत सक्रिय सक्षम नागरिक होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आलो आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.