Meenakshi Seshadri death rumour : अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीच्या निधनाच्या सोशल मीडियावर अफवा

0

एमपीसी न्यूज – दामिनी, घातक या सारख्या दमदार चित्रपटांची अभिनय करून 80 आणि 90च्या दशकात चित्रपट सृष्टी गाजवणारी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिच्या निधनाची रविवारी सायंकाळपासून सोशल मीडियावर अफवा पसरली आहे.

कोरोनामुळे तिचा मृत्यू झाल्याचेही म्हटले जात होते. परंतु आता स्वतः मीनाक्षीने या अफवांचं खंडन केले असून तिने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

मीनाक्षी सध्या अमेरिकेतील टेक्सास येथे पती आणि दोन मुलासोबत राहते. तिने सोशल मीडियावर टेक्सासचे लोकेशन टाकत स्वतःचा डान्स पोज मधला फोटो पोस्ट केला आहे.

मीनाक्षी शेषाद्री ने 1983 साली पेंटर बाबू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती 1983 मध्येच आलेल्या हिरो चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली होती. या चित्रपटात तिने जॅकी श्रॉफ सोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने मेरी जंग, घायल, घातक, दामिनी यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment