Pune : आदित्य ठाकरे यांना महापालिकेचा पर्यावरण अहवाल भेट

एमपीसी न्यूज – पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पुणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरण विभागाचा अहवाल भेट देण्यात आला.

यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक, प्रविण गेडाम, नितिन देशपांडे व मंगेश दिघे, संकेत जाधव उपस्थित होते.

बुधवारी आदित्य ठाकरे यांनी पुणे विभागातील सर्व पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन व पर्यटन याबाबत बैठक घेतली. अत्यंत महत्त्वाच्या विषयाची माहिती दिली व आपल्या खात्याची दिशा ही स्पष्ट केली. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर, एमपीसीबीचे अधिकारी जगन्नाथ सांळुखे व इतर अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.