Alandi : आळंदी बंद संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये बैठक; आळंदीकर बंदच्या निर्णयावर ठाम

एमपीसी न्यूज : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर (Alandi ) आळंदीतील ग्रामस्थांना विश्वस्त म्हणून डावलल्याबद्दल 5 डिसेंबर रोजी आळंदी बंदची हाक समस्त ग्रामस्थ आळंदीकरांनी दिली होती. त्याचे निवेदन 3 डिसेंबर रोजी आळंदी पोलीस स्टेशनला देण्यात आले होते. त्याच संबंधित विषयावर आज आळंदी पोलीस स्टेशन यांनी समस्त आळंदीकर ग्रामस्थांची  बैठक आयोजित केली होती.

Chakan : भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; एक जण जखमी

यावेळी आळंदीकर ग्रामस्थांनी लोकशाहीच्या मार्गाने व शांततेत आळंदी बंद राहील. व्यापारी वर्गाचा आम्हाला त्या संदर्भात पाठींबा आहे पोलीस प्रशासनास सांगितले. तसेच विश्वस्त योगेश देसाई यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना आळंदीकरांचे योगदान व देवस्थानला मदत काय? असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा समस्त आळंदीकर ग्रामस्थांकडून निषेध होत आहे. तसेच त्यांनी ते वक्तव्य मागे घेऊन ग्रामस्थांची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

आळंदी बंद बाबतीत आळंदीकर ग्रामस्थांच्या ज्या भावना आहेत; त्या वरिष्ठांना कळविण्यात येतील. तसेच कार्तिकी यात्रेसाठी आळंदीत येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.