PCMC News: पिंपरी चिंचवड शहराच्या घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहराच्या औद्योगिक क्षेत्रातील लघु आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांमधून निर्माण होणा-या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रक्रीया संयंत्रणा (सीईटीपी) उभारणे, घनकचरा व्यवस्थापन, औद्योगिक परिसरातील सुरक्षा व्यवस्था, तळवडे भागातील रेड झोन संदर्भातील महापालिकेशी संबंधित बाबी, विविध सुविधांसाठी आवश्यक असणा-या औद्योगिक महामंडळाच्या जागेचे विषय आणि साहित्य पुनर्वापर सुविधा आदी विषयांबाबत आज 5 डिसेंबर रोजी प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

Chinchwad News : सांस्कृतिक वारसा जपणारी प्रभात कल्चरल फाऊंडेशन संस्था – संजय कुलकर्णी

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता रामदास तांबे आणि प्रमोद ओंभासे, उपआयुक्त अजय चारठाणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता हरविंदर बन्सल, योगेश आल्हाट, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष दिपक करंदीकर, पराग कुलकर्णी, सुधान्वा कोपर्डेकर, प्रलोष गुप्ता, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बेलसरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबणीस, सीईटीपी फाऊंडेशनचे मिलिंद वराडकर, संजीव शहा, प्रोक्योरमेंट कन्सल्टंट नवनीत झा, महाराष्ट्र इन्व्हारो पॉवर लिमिटेडचे उपमहाप्रबंधक राकेश मिश्रा, अमित बजाज आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.