Pimpri : पंतप्रधान कार्यालयात रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक

एमपीसी न्यूज –   रिक्षा टॅक्‍सी चालकांचे प्रश्‍न समजावून घेत, ते सोडविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी देशभरातील रिक्षा टॅक्‍सी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्‍न समजावून घेतले. देशभरातील रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक घेतली जाईल असे आश्‍वासन डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिले.

रिक्षा विमा हप्ता (इन्शुरन्स) रकमेत केलेली भरमसाठ वाढ, रिक्षा चालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, रेल्वे स्टेशनवर रिक्षा टॅक्‍सी चालकांची जागा भांडवलदार कंपन्यांना भाड्याने दिली जात आहे. ओला उबर, मुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे, बॅटरी अपरेड रिक्षा या सह विविध प्रश्‍नांवर या वेळी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे, भारतीय मजदूर संघाचे नेते राजेंद्र सोनी, जम्मू- काश्‍मीर रिक्षा टॅक्‍सी संघटनेचे अध्यक्ष अचल सिंग, अखिल मोटर ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष मधुकर थोरात, नवी मुंबई कृती समितीने नेते मारुती कोंडे, सुनील बोर्डे, विजय पाटील, श्रीरंग जाधव, विदर्भ रिक्षा फेडरेशनचे मोशविर लोकरे, दीपक दासगाय, गणेश चौधरी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.