Pimpri : स्थायी समितीची सभा शनिवारपर्यंत तहकूब 

अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहून सभा केली तहकूब 

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय अर्थ, संरक्षण मंत्री, भाजपजे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहून पिंपरी-चिंचवड महापालिकेची आज (बुधवार) स्थायी समितीची सभा शनिवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने 24 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ भाजपचे नुकसान झाले नाही. तर, देशाचे नुकसान झाले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी कायदामंत्री म्हणून कामकाज केले. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात त्यांनी अर्थ व संरक्षण अशी महत्वाची खाती समर्थपणे सांभाळली आहेत. त्यांच्या निधनामुळे देशाची मोठी हानी झाली आहे, अशी भावना स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी व्यक्त केली.

जेटली यांना श्रद्धांजली वाहून आजची स्थायी समितीची साप्ताहिक सभा शनिवार (दि. 31) दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब केल्याचे मडिगेरी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.