Pune News : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत आज बैठक

एमपीसी न्यूज : शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी बैठक घेणार आहे. यामध्ये शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करणाऱ्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर या बैठकीमध्ये अजून कडक निर्बंध लावायचे का, ऑफिसमध्ये 50 टक्के उपस्थिती आदींबाबत निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.

शहरात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शाळा-महाविद्यालये बंद ठेऊनही करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत नाही. त्यामुळे मागील शुक्रवारीच संचारबंदी रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत, हॉटेल, रेस्टॉंरट आणि बार दहा वाजता बंद करणाचे आदेश दिले आहेत. रात्री 10 ते 11 या वेळेत फक्त पार्सल सुविधा, हॉटेल निम्म्या क्षमतेनेच सुरु ठेवण्याचे आदेश दिले.

तसेच, हातगाड्यांवर पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येण्यास मनाई अशा सूचनाही दिल्या. मात्र, सात दिवस झाले तरी कोरोनाच्या संख्येत घट झालेली दिसून येत नाही. यापार्श्‍वभूमीवर करोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणखी कठोर निर्बंध लावायचे का, यावर चर्चा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.