BNR-HDR-TOP-Mobile

Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी दोन तासांचा मेगा ब्लॉक

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी (दि. 18) दुपारी 12 ते 2 या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. खालापूर टोलनाक्याच्या अगोदर 17/000 किलोमीटर येथे ओव्हरहेड गॅन्ट्री उभारण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (एमएससीआरटी)तर्फे कमान बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई-पुणे या मार्गावरील दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे.

दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार (जुना मुंबई-पुणे महामार्ग)वर वळविण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान अवजड वाहनांची वाहतूक चिखले ब्रिजपासून मागे थांबविण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे मार्गावरील सर्व प्रवासी वाहनचालकांनी शेडूग फाटा-आजिवली चौक-दांड फाटा-चौक (कर्जत) फाटा-खालापूर फाटा (सावरोली फाटा) येथून खालापूरमार्गे परत खालापूर टोल नाक्यावरून पुण्याच्या दिशेने या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलीस पनवेल विभागाकडून करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.