Pune : मेगा प्रो एफए, सोनबा रेडर्स, सुखाई एफसी, मातोश्री संघ उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज – मेगा प्रो फुटबॉल ऍकॅडमी, सोनबा रेडर्स आणि सुखाई एफसी संघांनी शानदार विजयासह सृजन करंडक 2019 “सिक्‍स अ साईड’ स्लम फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या 16 वर्षांखालील गटाच्या या स्पर्धेतील चोंडे पाटिल स्पोर्टस झोन, औंध येथे झालेल्या सामन्यात मेगा प्रो संघाने आयडियल इंग्लिश माध्यम प्रशाला संघाचा 4-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरी सामन्यातील हा सर्वांत मोठा विजय होता. मेगा प्रो संघाकडून दोन्ही सत्रात प्रत्येकी दोन गोल नोंदवले गेले. आदित्य पवारने 5 आणि 7व्या मिनिटाला असे दोन गोल केले. उत्तरार्धात असिब शेखने 10व्या आणि खुशहाल सिंगने 13व्या मिनिटाला गोल केला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सोनबा रेडर्स संघाने लेट अनंतराव मेमोरियल इंग्लिश माध्यम प्रशाला संघाचा 2-0 असा पराभव केला. यश सुरवसेने चौथ्या आणि कार्तिक मंतुरने पाचव्या मिनिटाला गोल केला. तिसऱ्या सामन्यात सुखाई एफसी संघाने अभिषेक पालच्या 11व्या मिनिटाला झालेल्या एकमात्र गोलच्या जोरावर पूज्य कस्तुरबा इंग्लिश माध्यम प्रशाला संघाचा 1-0 असा पराभव केला. अखेरच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मातोश्री इंग्लिश माध्यम प्रशाला संघाला हिंदुस्थान अँटिबायोटिक ब संघाने पुढे चाल दिली.

निकाल –
16 वर्षांखालील मुले – मेगा प्रो फुटबॉल ऍकॅडमी 4
 (आदित्य पवार 5, 7वे, असिब शेख 10, खुशहाल सिंग 13वे मिनिट) वि.वि. आयडियल इंग्लिश माध्यम स्कूल 0

सोनबा रेडर्स 2 (यश सुरवसे 4वे, कार्तिक मंतुर 6वे मिनिट) वि.वि. स्व. अनंतराव मेमोरियल इंग्लिश माध्यम स्कूल 0

सुखाई एफसी 1 (अभिषेक पाल 11वे मिनिट) वि.वि. पूज्य कस्तुरबा इंग्लिश माध्यम स्कूल 0

मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूल वि.वि. हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स ब (पुढे चाल)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like