Pune News : मेघश्याम डांगेंचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केला सत्कार

एमपीसी न्यूज : कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. यानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने गिरीश गुरनानी यांनी डांगे यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.

डांगे हे एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत. प्रशासन व राष्ट्रपतींनी हे पदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. डांगेंबरोबरच कोथरूडसाठी ही अभिमानाची बाब आहे. जनतेने अश्या प्रामाणिक अधिका-यांना अधिकाधिक सहयोग करावा जेणेकरून त्यांच्या पोलीस कार्यात अजून भर पडेल, असे गिरीश गुरनानी यांनी यावेळेस सांगितले.

यावेळेस कोथरूड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल गायकवाड, मिलिंद शिंदे, विशाल विचारे, सागर पळे, मंगेश भोंडवे, संतोष सोनावणे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.