Jammu and Kashmir : मेहबुबा मुफ्ती यांना पुन्हा अटक

एमपीसी न्यूज : जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना पुन्हा एकदा कश्मीर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची कन्या इल्तिजा हिलादेखील नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करत आपल्याला पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे. ‘गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-कश्मीर प्रशासन मला पुलवामामध्ये जाऊन पक्षाचे नेते वहीद ऊर रहमान यांच्या कुटुंबाला भेटू देत नाहीत. भाजपचे मंत्री आणि मित्रपक्षाचे नेते राज्यात कुठेही फिरत आहेत. फक्त माझ्या बाबतीतच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो का?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.