Pimpri : नागपंचमीनिमित्त पिंपरीगावात मेहंदी कार्यक्रम

 लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमधील पहिली आर्टिस्ट धनश्री हेंद्रे यांचाही सहभाग

एमपीसी न्यूज –   पिंपरीगाव येथील नगरसेविका उषा वाघेरे अंतर्गत नागंपंचमीनिमित्त सर्व महिला बचत गट व पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे मेहंदी कार्यक्रम घेण्यात आला. 

या स्पर्धेत   धनश्री मनोज हेंद्रे हे गेली १६ वर्षे मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करतात, या मेहंदी कलेच्या माध्यमातून त्यांनी दोन वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. सलग ३२ तास नॉनस्टॉप ४०८ हातांवर मेहंदी काढून लिमिका बूक ऑफ रेकॉर्ड आणि यूनिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली तसेच महाराष्ट्रातील पहिली आर्टिस्ट होण्याचा मान त्यांनी मिळविला, त्यानिमिताने कै. भिकु वाघेरे प्रतिष्ठान संलग्न सर्व महिला बचत गटाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार नगरसेविका उषा संजोग वाघेरे  यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी धनश्री हेंद्रे म्हणाल्या, चारशेपक्षा अधिक हातांवर मेंदीच्या रेखाटनाची किमया साकारताना धनश्री यांनी ३२ तासांमध्ये केवळ दोनदा दहा मिनिटांची विश्रांती घेतली.सर्वाधिक काळ मेंदी रेखाटण्याचा विक्रम यापूर्वी अहमदाबाद येथील दीप्ती देसाई यांच्या नावावर होता. त्यांनी २८ एप्रिल २०११ रोजी २४ तास ४५ मिनिटे या वेळात १७० हातांवर मेंदी काढली होती. दीप्ती देसाई यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती. हा विक्रम मोडण्याच्या उद्देशातून धनश्री हेन्द्रे यांनी ३२ तास मेंदी काढण्याचा संकल्प केला.एका हातावर किमान आठ ते नऊ मिनिटांमध्ये नक्षीदार मेंदी रेखाटली गेली. साधारणपणे एका तासाला ११ ते १२ हात नयनरम्य मेंदीच्या कलाकुसरीने रंगले होते.

धनश्री या मूळच्या नगरच्या. मनोज हेन्द्रे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या पुण्यामध्ये वास्तव्याला आल्या. शुक्रवार पेठेतील बाफना पेट्रोल पंप परिसरामध्ये हे दांपत्य वास्तव्यास आहे. हेन्द्रे यांनी पत्नीच्या या कला शिक्षणाला प्रोत्साहन देत त्यांना क्लासेस सुरू करण्यासाठी सहकार्य केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कामास असलेल्या मनोज यांनी धनश्री यांनी मेंदी काढण्याच्या विश्वविक्रमासाठी पाठबळ दिले. एवढेच नव्हे तर, चक्क रजा काढून ते पत्नीला सर्वतोपरी मदत करीत होते.

या मेहंदी कार्यक्रमात ५०० महिला सहभागी झाल्या होत्या, कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास ग्रामस्थ व अनेक महिला उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like