Melodies of Asha Bhosale : आशा भोसले यांच्या सदाबहार गीतांचा खजिना सादर करीत दृष्टी बलानीने केले रसिकांना मंत्रमुग्ध 

एमपीसी न्यूज –  ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ (Melodies of Asha Bhosale) या कार्यक्रमात आशाताईंच्या सदाबहार गीतांचा खजिना रसिकांपुढे सादर करण्याचे आव्हान लीलया पेलत युवा गायिका दृष्टी बलानी हिने शनिवारी रात्री रसिकांना मंत्रमुग्ध केले. आशाताईंच्या गाण्यांबरोबरच आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात आल्याने रसिकांचा आनंद द्विगुणित झाला. 

‘वॉल्ट्स आर्क’ या संस्थेच्या वतीने शनिवारी (17 डिसेंबर) रात्री पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ‘व्हॉईस ऑफ आशा’ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या दृष्टी बलानी या युवा गायिकेने उपस्थित रसिकांची मने जिंकली. ‘व्हॉईस ऑफ किशोर’ म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र भुरुक आणि ‘व्हॉईस ऑफ आरडी’ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत साळवी या प्रतिथयश गायकांबरोबरच ‘पंचम ट्राईब’च्या 30 कलाकारांनी (Melodies of Asha Bhosale) या कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Melodies of Asha Bhosale

या कार्यक्रमाचे डिजिटल मीडिया पार्टनर ‘एमपीसी न्यूज’ तर मीडिया पार्टनर देनिक ‘पुण्यनगरी’ होते. मुंबईच्या ‘महाराष्ट्र बाजार’ने या श्रोत्यांवर बक्षिसांचा वर्षाव केला. त्यात महिलांसाठी पाच पैठणी साड्या, पुरुषांसाठी पाच सूट लेंथ व प्रत्येकी 10 हजार रुपयांची पाच डायमंड ज्वेलरी गिफ्ट व्हाऊचर ही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.

Pune : महेश काळे आणि संदीप नारायण यांच्या हिंदुस्थानी – कर्नाटक संगीत जुगलबंदीने रसिक भारावले

मान्यवरांची उपस्थिती 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘महाराष्ट्र बाजार’चे प्रमुख कौतीक दांडगे, एमपीसी न्यूजचे मुख्य संपादक विवेक इनामदार, कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर, पुण्यनगरीचे वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक राहुल लिमये उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व वॉल्ट्स आर्कचे संस्थापक संचालक मनीष रुब्दी तसेच रेचल रुब्दी व केविन रुब्दी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र बाजारचे प्रमुख कौतिक दांडगे (उजवीकडील) यांचा सत्कार करताना कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मनीष रुब्दी

‘वॉल्ट्स आर्क’चे संस्थापक मनीष रुब्दी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम (Melodies of Asha Bhosale) सादर करण्यात आला. संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमांविषयी संगीत रसिकांच्या मनात गोडी निर्माण व्हावी तसेच गायन-वादनाच्या कार्यक्रमांवर आवलंबून असणाऱ्या कलाकारांच्या अस्तित्वासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Pimpri Chinchwad : गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यासाठी एकवटले हिंदू

किशोर कुमार यांच्या आवाजातील ‘ये जवानी है दिवानी’ या जितेंद्र भुरूक यांनी सादर केलेल्या धमाल गाण्याने या संगीत रजनीची सुरूवात झाली. त्यानंतर आर.डी. बर्मन यांच्या आवाजातील ‘समंदर मैं नहाके’ हे गाणे सादर प्रशांत साळवी यांनी रसिकांना समुद्रकिनाऱ्याची सफर घडवली. त्यानंतर कार्यक्रमाची मुख्य गायिका दृष्टी बलानीचे स्टेजवर आगमन झाले. त्यानंतर कधी सोलो तर कधी सहकालाकारांबरोबर आशाताईंची विविध गाणी सादर दृष्टीने रसिकांच्या टाळ्यांबरोबरच ‘वन्स मोअर’ देखील वसूल केले.

Melodies of Asha Bhosale
जितेंद्र भुरूक, दृष्टी बलानी व प्रशांत साळवी

दृष्टीची कमाल

‘आज की रात’ या गाण्यानंतर ‘दिल पडोसी है’ या अल्बममधील ‘भिनी भिनी भोर आयी’ हे गाणं दृष्टीनं तेवढ्याच ताकदीनं सादर केलं. त्या पाठोपाठ ‘खलिफा’मधील ‘दिल मचल रहा है’, ‘द ट्रेन’ मधील ‘मेरी जान मैने कहा’, ‘जोशिला’मधील ‘सोना रे’ या गाण्यानं रसिकाकडून पसंतीची पावती मिळवली.  ‘कह दू तुम्हे या चूप रहू’, ‘पिया बावरी’ या गाण्यांनाही प्रचंड दाद मिळाली. ‘जवानी दिवानी’ मधील ‘जाने जा’, ‘हमशकल’मधील ‘फस गयी’, ‘सनम तेरी कसम’मधील ‘जाना ओ मेरी जाना’ या गाण्यांनी (Melodies of Asha Bhosale) रसिकांना अक्षरशः नाचायला लावले. रंगमंचासमोरील मोकळ्या जागेत येऊन नृत्य करीत काही प्रेक्षकांनी गाण्याचा मनोसक्त आनंद लुटला.

जितेंद्र भुरूक, दृष्टी बलानी व प्रशांत साळवी
‘इजाजत’ चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान’ हे गाणं तेवढ्याच ताकदीनं सादर करीत दृष्टीनं तिच्या गायकीतलं वैविध्यही दाखवून दिलं. ‘आओ ना गले लगाओ ना’ या गाण्यानं रसिकांना ठेका धरायला भाग पाडलं. ‘येऊ कशी प्रिया’ हे आशाताईंचं मराठी गाणं सादर करीत दृष्टीनं प्रेक्षकांची फर्माईश पूर्ण केली. ‘मेरे जीवन साथी’, ‘हरजाई’ चित्रपटातील ‘तुजसा हसी देखा ना कही’ या गाण्यानंतर दृष्टी बलानी, जितेंद्र भुरूक आणि प्रशांत साळवी या तिन्ही गायकांनी ‘आ देखे जरा किसमे कितना हैं दम’ हे दमदार गाणं सादर प्रचंड उंची गाठलेल्या या कार्यक्रमातील गाण्यांची सांगता केली.
Melodies of Asha Bhosale
प्रशांत साळवी व दृष्टी बलानी
वादकांची साथसंगत 

ज्येष्ठ संगीत संयोजक विजय मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली वॉल्ट्ज म्युझिक अकादमीच्या “पंचम ट्राइब” च्या वादक कलाकारांनी (Melodies of Asha Bhosale) कार्यक्रमाची रंगत वाढवली. ऱ्हिदम विभागात केविन रुब्दी, जोशुआ शिंदे, शुभम गोळे, रोहित साने, आयुष शेखर या कलाकारांनी तर मेलडी विभागात रेणू वाडकर खरबस, सायली सावळकर, मानसी काटे, सावनी वर्मा, बाबा खान, चिंतन मोढा, सुशील सिरसाठ या कलाकारांनी त्यांच्या वादनकौशल्याने रसिकांकडून दाद मिळवली. स्वर माधुरी कोरस ग्रुपच्या गायक कलाकारांनी त्यांची जबाबदारी उत्तम पद्धतीने सांभाळली तर ध्वनी व प्रकाश व्यवस्था गौतम साऊंड आणि लाईट्सचे राजरत्न पवार यांनी पाहिली.

नामवंत निवेदक महेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करीत प्रेक्षकांकडून वेळोवेळी टाळ्या वसूल केल्या.

कार्यक्रम संपू नये असं वाटत असतानाच नाट्यगृहाच्या वेळेच्या बंधनामुळे भाग्यवान प्रेक्षकांची निवड करण्यासाठी सोडत काढण्यात आली.

भाग्यवान श्रोत्यांची नावे

महाराष्ट्र बाजार पेठ तर्फे 5 पैठण्या, 5 सूट पीस आणि 5 डायमंड व्हाउचर यांचा लकी ड्रॉ खास प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आला होता. भाग्यवान विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे –

1) पल्लवी पाटोळे

2) स्वाती भोंडवे

3) प्राची आचार्य

4) विजया माळी

5) गीता वाईकर

6) दिलीप आगनोरे

7) रमेश लोखंडे

8) सचिन पाटोळे

9) ख्रिस्तोफर लिओ

10) अजय धायगुडे

11) नेल्सन

12) करुणा थावरे

13) पल्लवी कुलकर्णी

14) विवेक इनामदार

15) शीला सारडा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.