Melodies of Asha Bhosale : घ्या आशा भोसले यांच्या गाण्यांचा आनंद… त्याच बरोबर जिंका आकर्षक भेटवस्तू!

एमपीसी न्यूज – सहा दशकांहून अधिक काळ आपल्या वैविध्यपूर्ण शैलीने संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लोकप्रिय अष्टपैलू गायिका (Melodies of Asha Bhosale) ‘मेलडी क्वीन’ आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्यांचा मनसोक्त आनंदाबरोबरच आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

‘वॉल्ट्स आर्क’ या संस्थेच्या वतीने 17 डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे ‘व्हॉईस ऑफ आशा’ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या दृष्टी बलानी या युवा गायिकेचा ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘व्हॉईस ऑफ किशोर’ म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र भुरुक आणि ‘व्हॉईस ऑफ आरडी’ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत साळवी या प्रतिथयश गायकांबरोबरच ‘पंचम ट्राईब’चे 30 कलाकार या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. या कार्यक्रमात डिजिटल मीडिया पार्टनर म्हणून  ‘एमपीसी न्यूज’चा सहभाग असणार आहे.

‘वॉल्ट्स आर्क’चे संस्थापक मनीष रुबदी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमांविषयी संगीत रसिकांच्या मनात गोडी निर्माण व्हावी तसेच गायन-वादनाच्या कार्यक्रमांवर आवलंबून असणाऱ्या कलाकारांच्या अस्तित्वासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाची तिकीट विक्री देखील सुरू (Melodies of Asha Bhosale) असून शोचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपण कार्यक्रमाच्या प्रवेशिका विकत घेऊ शकता. महाराष्ट्र बाजार पेठ यांच्या वतीने प्रत्येक तिकिटावर श्रोत्यांना हमखास एक भेटवस्तू देण्यात येणार आहे. याखेरीज भव्य लकी ड्रा देखील काढण्यात येणार आहे. त्यात महिलांसाठी पाच पैठणी साड्या, पुरुषांसाठी पाच सूट लेंथ व प्रत्येकी 10 हजार रुपयांची पाच डायमंड गिफ्ट व्हाऊचर ही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

‘मेलडीज ऑफ आशा भोसले, ‘व्हॉईस ऑफ आशा’, ‘वॉल्ट्स आर्क’ व एमपीसी न्यूज यांच्या वतीने आयोजित, Local News, marathi news, Melodies of Asha Bhosale Quiz 5, Melodies of Asha Bhosale Quiz 5 Result, MPC news, pimpri-chinchwad, pune city, Pune news, Quiz competition, Singer Asha Bhosale, Voice Of Asha, Voice OF Asha Program

कार्यक्रमासाठी फोन कॉलवर देखील आपण तिकीट बुक करू शकता. त्यासाठी पुढील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा. तिकिटे घरपोच पोहचविण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

9371906062 / 7350005121

Amitabh Gupta : पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील; मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भावना

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.