एमपीसी न्यूज – सहा दशकांहून अधिक काळ आपल्या वैविध्यपूर्ण शैलीने संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लोकप्रिय अष्टपैलू गायिका (Melodies of Asha Bhosale Quiz 4) ‘मेलडी क्वीन’ आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्यांचा मनसोक्त आनंद लुटण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा, विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या आणि जिंका ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ या भव्य कार्यक्रमाच्या दोन प्रवेशिका!
‘वॉल्ट्स आर्क’ या संस्थेच्या वतीने 17 डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे ‘व्हॉईस ऑफ आशा’ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या दृष्टी बलानी या युवा गायिकेचा ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘व्हॉईस ऑफ किशोर’ म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र भुरुक आणि ‘व्हॉईस ऑफ आरडी’ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत साळवी या प्रतिथयश गायकांबरोबरच ‘पंचम ट्राईब’चे 30 कलाकार या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. या (Melodies of Asha Bhosale Quiz 4) कार्यक्रमात डिजिटल मीडिया पार्टनर म्हणून ‘एमपीसी न्यूज’चा सहभाग असणार आहे.
‘वॉल्ट्स आर्क’चे संस्थापक मनीष रुबदी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमांविषयी संगीत रसिकांच्या मनात गोडी निर्माण व्हावी तसेच गायन-वादनाच्या कार्यक्रमांवर आवलंबून असणाऱ्या कलाकारांच्या अस्तित्वासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत रसिकांच्या ज्ञानात व माहितीत भर घालणारी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. या प्रश्नमंजुषेत आशा भोसले यांच्या गाण्यांशी संबंधित असणारे दोन प्रश्न रोज विचारले जातील. या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांमधून सोडत पद्धतीने दररोज 25 स्पर्धकांची निवड करण्यात येईल. या भाग्यवान विजेत्यांना ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ या कार्यक्रमाच्या प्रत्येकी दोन मोफत प्रवेशिका देण्यात येतील.
प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
https://forms.gle/7ogmidUDcN87tXqU7