Pune : विरोधी पक्षनेत्यांना बोलू न दिल्याने सभात्याग

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांत सुमारे 10 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी-शिवसेना – काँगेसच्या नगरसेवकांनी केला. त्याच्या निषेधार्थ बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षातर्फे करण्यात आली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बोलू न दिल्याने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.

विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांना बोलू देण्यात आले होते. त्याचप्रमाणे सभागृह नेते धीरज घाटे यांना बोलू द्या, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. मात्र, आधी आम्हाला बोलू द्या, नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, भाजपा हमसे डरती है, म्हणत विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, यांच्यासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामुळे विरोधकाविनाच भाजपने सभेचे कामकाज चालविले.

दिलीप बराटे म्हणाले, 10 हजार कोटींच्या घोटाळ्यांवर सर्वांना बोलू द्या. वेगवेगळ्या 5 प्रकल्पांच्या टेंडरमध्ये 10 हजार कोटींचा घोटाळ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार यापूर्वी महापालिकेच्या इतिहासात कधीही झाला नाही. टेंडरमध्ये किमती फुगविण्यात आल्या. 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले नाही. एचसीएमटीआरमध्ये 2200 ते 2300 कोटी रुपये पुणेकरांचे वाचले. नदी सुधार योजनेसाठी 1200 कोटी होते. 400 कोटीचे टेंडर रद्द करावे लागले.

जलपर्णी, कात्रज – कोंढवा रस्ता टेंडरमध्येही घोटाळा झाला आहे. याची सखोल न्यायालयीन, सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. लोकप्रतिनिधीचीही चौकशी करा. आपण 20 वर्षे झाले नगरसेवक आहोत, पण अशी परिस्थिती पहिली नाही. तुम्हाला विकास नको आहे का, निवडणुकीच्या काळात अनेक प्रकल्पांच्याही घोषणा केल्या होत्या. प्रसंगी राज्य सरकारकडे दाद मागण्याचा ईशाराही बराटे यांनी दिला. आयुक्तांनी हे टेंडर न काढल्याने त्यांचे आपण अभिनंदन करीत असल्याचेही बराटे यांनी सांगितले. आयुक्तांवर केंद्र आणि राज्य सरकारचा दबाव असतानाही त्यांनी भीक घातली नाही.

विनाविरोधकाविना महापालिकेचे कामकाज सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.