BNR-HDR-TOP-Mobile

Pune : संघटन पर्व अभियानांतर्गत भाजपकडून सदस्य नोंदणी सुरू

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. ६ जुलै या जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीपासून हे अभियान सुरु होऊन ते ११ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने या अभियानास “संघटन पर्व” असे नाव देण्यात आले आहे.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, गावापासून महानगरापर्यंत, शेतकरी, कामगार, गरीब, श्रीमंत अशा सर्व घटकांना सामावून घेणारे हे सदस्य अभियान आहे. २०१५-१६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजपा हा जगातील सर्वात मोठा सदस्य असणारा पक्ष ठरला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले पाहावयास मिळतात.

आज पुणे शहरात भाजप युवा मोर्चा तसेच भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने या आभियानाची सुरुवात करण्यात आली. पुणे शहर प्रभाग क्र.9 बाणेर-बालेवाडी मध्ये जनसामान्य लोकांमध्ये जाऊन कष्टकरी कामगार, व्यापारी, तरुण सहकारी, तसेच माता भगिनी, विद्यार्थी मिञांच्या साथीने या आभियानाची सुरुवात जोरदार झाली असून ५०० अधिक सदस्य नोंदणी झाली आहे. या नोंदणी आभियानाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये पहावयास मिळेल.

या सदस्य नोंदणी आभियानात पुणे शहराचे भाजप विद्यार्थी आघाडीचे सरचिटणिस तसेच युवानेते शिवम बालवडकर तसेच भाजप विद्यार्थी आघाडीचे कार्यकारणी सदस्य युवानेते सोहम मुरकुटे यांचा मोलाचा वाटा तसेच सक्रिय सहभाग आहे.

HB_POST_END_FTR-A2

.