Nigdi : निगडीत उद्या ‘आठवणीतले अटलजी’, अटलजींच्या कवितांचे वाचन

सावरकर मंडळातर्फे अटलजी यांना  श्रध्दांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम  

एमपीसी न्यूज – निगडीतील, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने  भारतरत्न दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी उद्या (गुरुवारी) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अटलजींच्या कवितांचे वाचन  केले जाणार आहे. तसेच ‘अटलजींच्या आठवणी’ माजी आमदार विश्वासराव गांगुर्डे सांगणार आहेत, अशी माहिती मंडळाचे  सहसचिव प्रदीप पाटील यांनी दिली. 

निगडी, प्राधिकरणातील सावरकर सदनात उद्या (गुरुवारी) सायंकाळी सात वाजता हे कार्यक्रम होणार आहेत.
मृत्यू अटल है, पर अटल अमर है। या वाक्याचा भावार्थ म्हणजे देहाने अटलजी आज आपल्यात नसले तरी उत्तम वक्ता, कवी, स्वयंसेवक, दूरदृष्टी , दुर्दम्य इच्छाशक्ती, अजातशत्रू व कुशल राजकीय नेता हे त्यांचे व्यक्तीमत्व आपल्याला व येणा-या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. श्रध्दांजली कार्यक्रमात अटलजींच्या  आठवणी माजी आमदार विश्वास गांगुर्डे सांगणार आहेत.  तसेच मान्यवर साहित्यिक  अटलजींच्या कवितांचे वाचन करणार आहेत. यावेळी फिल्मच्या माध्यमातून अटलजींचे विचार व भाषणे दाखवली जाणार आहेत.

या श्रद्धांजली कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, आवाहन सावरकर मंडळाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.