Pune University News : विद्यापीठाचे युजीसी मानव संसाधन केंद्र व ओडीसा राज्याचा उच्च शिक्षण विभाग यांमध्ये सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मानव संसाधन विकास केंद्र व ओडीसा राज्य उच्च शिक्षण विभाग यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार ओडीसा राज्यातील उच्च शिक्षणातील शिक्षकांना सर्वांगीण व व्यावसायिक विकासासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

देशभरातील विविध मानव संसाधन विकास केंद्रातून यासाठी ओडीसा सरकारने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्राची निवड केली आहे. केंद्रातर्फे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.नितीन करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मानव संसाधन विकास केंद्रासाठी अशा प्रकारे सामंजस्य करार करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठ हे देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. या करारावर मानव संसाधन विकास केंद्रातर्फे प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी तर ओडीसा राज्याच्या उच्च शिक्षण विभागातील उपसंचालक डॉ. राजेशकुमार साहू यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.