Talegaon Dabdade News : आठवणी श्री डोळसनाथ महाराज उत्सवाच्या!

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे हे पुणे जिल्ह्यातील एक पौराणिक गाव आहे. सह्याद्रीच्या कुशीत आणि इंद्रायणी, पवना नद्यांच्या सानिध्यात असलेलं तळेगाव. तळेगावला खूप मोठा  इतिहास लाभला आहे. त्यातील एक महत्त्वाचं पान म्हणजे शिवकालीन मावळच्या सुभेदाराचं इथंच वास्तव्य असायचं. पुढे दाभाडे घराण्याकडे मराठेशाहीचे सरसेनापतीपद आले. अशा लौकिकमान्य पंचक्रोशीचं श्री डोळसनाथ महाराज हे ग्रामदैवत आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षी आणि या वर्षी देखील डोळसनाथ महाराज उत्सव होऊ शकला नाही. हा उरूस म्हणजे तळेगावकरांसाठी आनंदाचा ठेवा आहे. नवीन पिढ्यांना या उरुसाची ओळख व्हावी आणि जुन्या लोकांच्या आठवणी जाग्या करण्याचा हा प्रयत्न.

_MPC_DIR_MPU_II

कलाविष्कार यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आणि उद्या नक्की पहा, “गुढीपाडव्या निमित्त, उरूस तळेगावचा”

माहितीचा हा खजिना दोन भागात बसवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.