Pune News : इंटेरियर करून न देता तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – घराचे इंटेरियर करून देण्याचा बहाणा करून तीन लाख पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर इंटेरियर करून न देता व्यक्तीची फसवणूक केली.हा प्रकार 10 सप्टेंबर   2021 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मोहननगर बाणेर येथे घडला.

तानाजी शिवाजी खेडेकर (वय 28, रा. मोहननगर, बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केतन कैलास शहा (रा. बिबवेवाडी,पुणे), जयाजी थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Savitrabai Phule Pune University: ‘गणेश अथर्वशिर्ष’ वर आता सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने सर्टीफिकेट कोर्स

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खेडेकर यांनी बाणेर येथील रोहन लेहर सोसायटीत फ्लॅट बुक केला. नोव्हेंबर 2021 मध्ये त्या फ्लॅटचे खेडेकर यांना पझेशन मिळाले.(Pune News) दरम्यान खेडेकर यांनी फ्लॅटचे फर्निचर, पीओपी, कलर, वॉलपेपर,किचन ट्रॉली, इलेक्ट्रिकल वर्क असे इंटेरियर डिझाईन करण्यासाठी आरोपींना काम दिले. त्यासाठी खेडेकर यांनी आरोपींना वेळोवेळी तीन लाख पाच हजार रुपये दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या फ्लॅटचे काम करून न देता त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.