Akurdi News : आरटीई प्रवेशासंबंधी आपची आकुर्डीत  मार्गदर्शन कार्यशाळा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये 25% जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया संबंधी आम आदमी पार्टीतर्फे आकुर्डी येथे 12 फेब्रुवारी रोजी पालकांची मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. याला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

आरटीई ऍक्ट 2009 नुसार महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नर्सरी ते पहिली च्या प्रवेशासाठी खाजगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवरती शैक्षणिक वर्ष 2021/22 मध्ये मोफत प्रवेशासाठी शासनाने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वसाधारण कुटुंबातील पालकांना ऑनलाईन प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रासंबंधी  या कार्यशाळेमध्ये आपचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी पालकांना मार्गदशन केले.

आरटीईसाठी करावयाच्या अर्ज प्रक्रिया तसेच प्रवेश घेतेवेळी शाळांकडून पालकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटने तर्फे मार्फत सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही सुभाष चौधरी यांनी केली. आरटीई प्रवेशासाठी पालकांना नोंदणी करण्यासाठी आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयांमध्ये संपर्क  करावा असे आवाहन आपचे पुणे जिल्हा युवाध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.