Customised Finance Offers: खरेदी करा Mercedes Benz आणि तीन महिने देऊ नका EMI

Mercedes Benz C Class E Class GLC SUV get exciting EMI offers in india and customised finance options for customers back

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याबरोबरच सरकारचे अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम ही सुरु आहे. केंद्र सरकारबरोबरच विविध कंपन्याही आपल्या उत्पादनांना मागणी यावी यासाठी पुढे सरसावल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर ऑटो कंपन्यांनी आपले उत्पादन आणि डिलरशीप सुरु केली आहे. परंतु, ग्राहकांनी अजूनही त्याकडे पाठ फिरवल्याचे दिसते. याचदरम्यान, ऑटो कंपन्यांनी आता आपल्या ग्राहकांना विविध आकर्षक ऑफर्स देण्यास सुरुवात केली आहे. मर्सिडिज बेंझ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स देण्याची घोषणा केली आहे.

मर्सिडिझ बेंझने आपल्या ग्राहकांसाठी विशबॉक्स 2.0 (Wishbox 2.0) हे विशेष पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. कंपनी या ऑफर्स सी-क्लास, ई-क्लास आणि जीएलसी एसयूव्ही मॉडेल्सवर देत आहे. कंपनीने विशबॉक्स 2.0 अंतर्गत तीन वेगवेगळ्या फायनान्स स्कीम सादर केल्या आहेत. कंपनीने एक दीर्घ कालावधी म्हणजेच 10 वर्षांपर्यंत कर्ज देत आहे. या स्कीम अंतर्गत तुम्ही किमान 1499 रुपयांचा ईएमआय भरु शकता.

या स्कीममध्ये 3 महिन्यांसाठी कोणताही ईएमआय द्यावा लागणार नाही. ‘ड्राईव्ह मोअर पे लेस’ (Drive More Pay Less) आणि 10 वर्षांसाठी कर्ज सारख्या योजनांचा समावेश आहे. त्याचबरोबर कंपनी ग्राहकांना 5 वर्षांचा बाय-बॅक चा पर्यायही देत आहे.

विशेष म्हणजे अशाप्रकारच्या ऑफर्स अनेक कार कंपन्या देत आहेत. लॉकडाऊनमध्ये कार खरेदी करताना ग्राहकांना या ऑफर्सचा लाभ उठवता येईल.

यावर मर्सिडिज बेंझ इंडियाचे एमडी आणि सीईओ मार्टीन शेवेंक म्हणाले की, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी फायनान्स सोल्यूशन विशबॉक्स 2.0 सादर केले आहे. ग्राहकांचा पुन्हा विश्वास प्राप्त करणे आणि तो आणखी मजबूत करणे, हा आमचा उद्देश आहे. आमची स्कीम इतरांपेक्षा वेगळी आहे आणि ग्राहक त्याचा नक्की फायदा घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.