Mercedez Benz : दसऱ्याच्या मुहूर्तावर देशात 550 मर्सिडीज कारची विक्री

एमपीसी न्यूज – मर्सिडीज बेंझ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झरी कार निर्माता कंपनीने नवरात्र आणि दस-याच्या मुहूर्तावर देशभरात विक्रमी गाड्यांची विक्री केली. कंपनीने 2019 ची पुनरावृत्ती करत दस-याच्या शुभ मुहूर्तावर 550 मर्सिडीज बेंझ कार विकल्या गेल्या.

मर्सिडीज बेंझच्या कारसाठी दिल्ली एनसीआर, मुंबई आणि गुजरात याठिकाणी ग्राहकांची जोरदार मागणी वाढली आहे. एकट्या दिल्लीमध्ये 175 नवीन मर्सिडीज-बेंझ कार विकल्या गेल्या. यामध्ये क्यू 3 या कारची सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे.

मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेनक म्हणाले, या उत्सवाच्या हंगामात मर्सिडीज घरी नेणा-या आमच्या ग्राहकांच्या आकांक्षा व उत्सवांचे अनलॉक करुन आम्हाला आनंद झाला आहे.

वितरणांची ही प्रभावी संख्या आम्हाला चांगल्या उत्सवाच्या हंगामाबद्दल आत्मविश्वास देते आणि मर्सिडीज-बेंझ ब्रँड आणि उत्पादनांवर लक्झरी कार खरेदीदारांचा विश्वास आणि आत्मविश्वास ठामपणे अधोरेखित करते. हा विश्वास आजच्या बाजाराच्या परिस्थितीच्या संदर्भात अधिक स्पष्ट होतो असं मत त्यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.