Pune : पारा 41.3 अंशांवर; उन्हाची तीव्रता वाढली

एमपीसी न्यूज- गेल्या काही दिवसांपासून 40 अंशाच्या आसपास रेंगाळणारा पारा पुन्हा वाढला आहे. आज 41.3 अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर लोहगावचे तापमान 41.7 अंश इतके नोंदवण्यात आले. त्यामुळे उन्हाची तीव्रता आणखी वाढल्याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला.  

आज दिवसभर उष्णतेचा तडाखा जाणवत होता. त्यामुळे अनेकांनी छत्री, स्कार्फ, रुमाल, संकोट  आदींचा उन्हापासून संरक्षणार्थ उपयोग केला. तर रसवंती, ज्यूसबार, कोल्डड्रिंक, असे थंड पेय घेण्याकडे शहरवासियांचा कल दिसून आला. मात्र, तरीही उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. नागरिकांनी झाडांची सावली, तर दुकांनांच्या शेड आणि जेथे सावली दिसेल त्या ठिकाणाचा आश्रय घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.