Pune : मेरी ख्रिसमस! एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देत शहरात ख्रिसमस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – मेरी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा, असे म्हणत एकमेकांना प्रेमाने आलिंगन देत ख्रिस्ती बांधवांनी आज पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला. 

पुण्यातील रास्तापेठेतील ख्राईस्ट चर्च, सिटी चर्च, पंचहौद येथील पवित्रनाम देवालय, सेंट पेट्रिक चर्च, सेंट मेरी चर्च, सेंट पॉल चर्चमध्ये भाविकांनी आलोट गर्दी केली होती. सर्व चर्चमध्ये काल मंगळवारी मध्यरात्री वॉच नाईट सर्व्हिस प्रार्थना घेण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात चर्चमध्ये गर्दी केली होती. तर भाविकांच्या चेह-यांवर ख्रिस्त जन्माचा आनंद ओसंडून वाहत होता.

आज शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त भक्ती घेण्यात आली. यावेळी येशू ख्रिस्तांच्या जन्माची माहिती देण्यात आली. धर्मगुरुंनी प्रवचन दिले. यावेळी लहान्यांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी मोठ्या भावपूर्ण वातावरणात चर्चमध्ये प्रार्थना केली. तर काही चर्चेसमध्ये ख्रिस्त जन्माचे देखावे सादर करण्यात आले. काही ठिकाणी ख्रिस्त जन्माची गाणी गाण्यात आली.

ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये तसेच घराघरांत विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. तर नवीन कपडे घालून नटून-थटून सर्वांनी  एकमेकांना शुभेच्छा देत आनंदात ख्रिसमस साजरा केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.