Pimpri News: ‘मॅसिकॉन 2022’ राज्यस्तरीय परिषदेची उत्साहात सांगता

परिषदे निमित्त आयोजित कार्यशाळेत पहिल्या दिवशी तब्बल 45 शस्त्रक्रिया प्रख्यात सर्जनद्वारे करण्यात आल्या. यामध्ये अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया, एंडोस्कोपिक, लॅपरोस्कोपिक, कॉलोनोस्कोपी, ओपन शस्त्रक्रियांचा समावेश होता. अत्यंत दुर्मिळ व गुंतागुंतीच्या तसेच आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या जागतिक दर्जाच्याअद्ययावत 7 शस्त्रक्रियागृहातून याचे सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रभरातून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. त्यानंतर पुढील दोन दिवस शल्यचिकित्सा व शैक्षणिक विषयानुसार तज्ञांची व्याख्याने, सादरीकरण, मार्गदर्शन, परिसंवाद आदीचे आयोजन पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये करण्यात आले होते.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात परिषद व कार्यशाळेचे उदघाटन पार पडले. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, कुलगूरू डॉ. एन. जे. पवार, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. शहाजी चव्हाण व पूना सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष चेतन म्हस्के असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ सिद्धेश जी, माजी अध्यक्ष डॉ अभय दळवी तसेच महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गणेरीवाल व पदाधिकाऱ्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
“वैद्यकीय कौशल्यपूर्ण ज्ञानाद्वारे कुशल शल्य चिकित्सक घडविण्यात या परिषदेचा फार मोठा वाटा आहे. सातत्यपूर्ण संशोधन व नावीन्यपूर्ण अध्यायनाच्या माध्यमातून रुग्णहित साध्य होत आहे”, असे मत कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी असोसिएशनच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या परिषदेच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण वातावरणात ज्ञानाचे आदान प्रदान करता आले. विविध प्रकारच्या शस्त्रक्रियाकरिता डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील जागतिक दर्जाच्या अद्ययावत शस्त्रक्रियागृहांबरोबर प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानासह येथील सेवा सुविधांचाही लाभ घेता आला तसेच अनुभवी तज्ज्ञांसोबत विचारमंथन आणि नाविन्यपूर्ण ज्ञानाचा अभ्यास करून परिषदेचा एकंदर उद्देश साध्य झाल्याची भावना सहभागी शल्यचिकित्सकांनी व्यक्त केली.
“मॅसिकॉन 2022” राज्यस्तरीय परिषद सन्मानीय कुलपती डॉ. पी. डी. पाटील, सन्मानीय प्र – कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील,