Message from Action: ‘मी काळजी घेतोय, स्वतःची आणि माझ्या लाडक्या ‘टेडी’ची! तुम्ही….?’

Message from Action: I'm taking care of myself and my darling 'Teddy'! You...? मुलं मोठ्याचं अनुकरण करतात, मोठ्यानीही काय हरकत आहे, या चिमुकल्याचं अनुकरण करायला?

एमपीसी न्यूज – लहान मुलं अनुकरणप्रिय असतात. आपल्या घरातील आजी, आजोबा आणि आई-वडिलांनी तोंडावर काय बांधलंय याचं कुतूहल असणाऱ्या या चिमुरड्याने त्याच्या टेडी बिअरलाही मास्क बांधून केलेलं हे अनुकरण!

कोविडयुगात कोट्यवधींच्या जाहिरातींद्वारे जनजागृती करण्याची मोहीम सुरू असताना तळेगाव दाभाडे येथील आदित्य वैभव दाभाडे या चिमुरड्याची कॅमेऱ्यात टिपलेली छबी लाखमोलाचा संदेश देणारी आहे. विशेष करून मास्क न वापरणाऱ्याना यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. एक बालक आपल्यासह टेडी बिअरची देखील किती काळजी घेतंय, तर मग आपण आपल्या कुटुंबातील प्रियजनांची काळजी घ्यायला नको का?

छोट्या आदित्यला कोरोना हे नाव माहीत असले तरी कोरोना विषाणू, कोरोना संसर्ग, कोरोनाचा धोका वगैरे काही काही माहीत नसणार… आपल्यावर प्रेम करणारे आपले कुटुंबीय मास्क लावून आपली काळजी घेतात, तशीच काळजी आपण आपलं प्रेम असलेल्यांची घ्यायला हवी, एवढा समजूतदारपणा मात्र नक्कीच त्याच्यात आहे. आदित्यने त्याच्या कृतीतून दिलेला संदेश प्रत्येकासाठी आणि समाजासाठीही लाख मोलाचा आहे, असंच म्हणावं लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.