Pune : हवामान खात्याचा सुधारीत अंदाज जाहीर, यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

एमपीसी न्यूज – भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मॉन्सूनच्या सुधारित अंदाजा जाहीर केला असून राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात देशात सरासरी इतक्या (96 टक्के) पावसाची शक्यता आहे.

Pune : टिंबर मार्केट येथील आगीच्या घटनास्थळाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

‘आयएमडी’तर्फे पुणे , (Pune)  शुक्रवारी (ता. 26 ) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हवामानशास्त्र विभागाच्या वातावरणीय देखरेख आणि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. एस. पै यांनी ही माहिती दिली. यावेळी मॉन्सूनचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यात आला.हवामान खाते, सुधारीत अंदाज जाहीर, जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, पुणे, आयएमडी

त्यानुसार यंदा जून ते सप्टेंबर (मॉन्सून काळात) दरम्यान देशात सरासरीच्या 96 टक्के पावसाची शक्यता असून त्यात चार टक्के कमी-जास्त तफावत असू शकते. तर मॉन्सूनवर अवलंबून असलेल्या भागात 94 ते 106 टक्के इतक्या सरासरीचा अंदाज आहे.

दरम्यान, अंदाज जाहीर करताना सादर करण्यात आलेल्या नकाशानुसार राज्याची स्थिती पाहता मॉन्सून हंगामात उत्तर मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम विदर्भासह मराठवाडा येथे पावसाची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच जून महिन्यात देशासह राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

यावेळी डॉ. पै म्हणाले, ‘‘यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा पावसाची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी देखील पेरणीसाठी घाई करू नये. पेरणी करताना किमान एक आठवडा पावसाची स्थिती पाहणे आवश्‍यक असते. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. यासाठी ‘आयएमडी’च्या वतीने कृषी क्षेत्रासाठी देखील विशेष अंदाज जाहीर केला जात असून त्याची वेळोवेळी पाहणी करावी.’

 

कसा असेल जून महिना –

देशात सरासरीच्या तुलनेत कमी म्हणजेच 92 टक्के पावसाची शक्यता आहे. जून महिन्यात देशात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होईल. तसेच, वायव्य भारतात ही पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी होणार आहे. या उलट देशाच्या द्वीपकल्पीय भागात, पूर्व मध्य भारत, ईशान्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

पावसाची शक्यता टक्केवारी मध्ये –

मध्य भारत – 94 ते 106

ईशान्य भारत – 94 ते 106

वायव्य भारत – 92

दक्षिण भारत – 94 ते 106

Maval : जांभूळ ग्रुप ग्रामपंचायतीस 40 लाखांचा निधी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.