मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Metro City Football Academy : बेबी फुटबॉल लीगमध्ये ‘मेट्रो सिटी’ विजेते

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (PDFA Under-8 champs) अभिनव उपक्रमातील आठ वर्षांखालील स्पर्धेत मेट्रो सिटी फुटबॉल अकादमीने (Metro City Football Academy) विजेतेपद मिळविले.

अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी बार्का अकादमीचा टायब्रेकमध्ये 11-0 असा पराभव केला.

नियोजित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत राहिला होता. आयन सोनिग्राने तिसर्या आणि अहान मुखर्जीने 15व्या मिनिटाला गोल करून दोनदा बार्का अकादमीला आघाडीवर नेले होते. मात्र, त्याचा त्यांना फायदा उठवता आला नाही.

सिद्धी देशमुखने सातव्या मिनिटाला गोल करून प्रथम मेट्रो संघाला (Metro City Football Academy) बरोबरीवर नेले. त्यानंतर 24व्या मिनिटाला दिविज पाटणकरने मेट्रो संघाला पुन्हा बरोबरी मिळवून दिली होती.

5G Internet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचं लोकार्पण

बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये मेट्रो सिटी फुटबॉल अकादमीने विजय मिळविला.

Latest news
Related news