Metro News : व्हॉट्स ॲपवरून मेट्रोचे तिकीट बुक करताय, सावधान !

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारा ( Metro News) सार्वजनिक वाहतूक सेवेचा सक्षम पर्याय म्हणून मेट्रो सेवा सुरु झाली आहे मात्र मेट्रोने प्रवास करताना प्रवाशांना काही अडचणी येत आहेत.व्हॉट्स ॲपवरून तिकीट बुकिंगसाठी नागरिकांना अडचणी येत असून त्याबाबत तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देखील मेट्रोने दर्शनी भागात लावलेला दिसत नसल्याचे प्रवाशांचे मत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीला सक्षम पर्याय म्हणून मेट्रोची सुरुवात करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरादरम्यान कमी वेळेत प्रवास करता येत आहे. असे असले ( Metro News) तरी मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या अडचणी काही सुटण्याचे नाव घेत नाहीत.
मेट्रोने प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी तसेच तिकिटाचा कागद वाचविण्याच्या इको फ्रेंडली संकल्पनेतून व्हॉट्स ॲप तिकीट ही सेवा सुरु केली आहे. ही सेवा मागील काही महिन्यांपासून सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांनी पुणे मेट्रोचा 9420101990 हा व्हॉट्स ॲप क्रमांक सेव्ह करावा. त्यावर Hi असा इंग्रजीत मेसेज केल्यास एक ओटीपी येतो. त्यातच तिकीट व्हेंडिंग मशीनवर ओटीपी देऊन तिकीट काढण्याचा अथवा थेट लिंकद्वारे मोबाईल मधून तिकीट काढण्याचा पर्याय येतो.
Talegaon Dabhade : फार्मासिस्ट दिनानिमित्त फार्मासिस्टचा सत्कार
‘Book Now’ या पर्यायावर क्लिक करून कुठून कुठवर जायचे आहे, प्रवास ( Metro News) एकमार्गी की परतीचा आहे, याची माहिती भरल्यास उपलब्ध असलेल्या पेमेंट गेटवे मधून पेमेंट करत ई तिकीट काढता येते. व्हॉट्स ॲप आलेल्या तिकिटाचा क्यू आर कोड स्कॅन करून प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येतो.
मात्र, काही प्रवाशांना या व्हॉट्स ॲप तिकिटाने चांगलेच हैराण केले आहे. व्हॉट्स ॲप वरून तिकीट काढताना संपूर्ण प्रोसेस होते. पैसेही कट होतात. मात्र तिकीट येत नाही. अशा वेळी तक्रार करण्यासाठी मेट्रोच्या फलाटावर अथवा मेट्रो मध्ये हेल्पलाईन नंबर देखील दर्शनी भागात लावले गेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा चांगलाच खोळंबा होतो.
प्रत्येक तिकिटावर, फलाटावर, मेट्रोच्या प्रत्येक कोचमध्ये दर्शनी भागात हेल्पलाईन नंबर लावण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर मेट्रो कडून मिळणाऱ्या प्रतिसादाने देखील हे प्रवासी नाराज आहेत. त्यामुळे व्हॉट्स ॲपवरून मेट्रोचे तिकीट बुक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला अनेकजण देऊ लागले आहेत.
मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, “मेट्रोच्या ॲपवर, सोशल मिडियावर तसेच मेट्रो स्थानकांवर 18002705501 हा हेल्पलाईन क्रमांक लावण्यात आला आहे. त्यावरून प्रवाशांच्या तक्रारींची नोंद घेऊन त्याचे तत्काळ समाधान केले जाते. तसेच प्रवासी त्यांच्या अडचणींबाबत मेट्रो स्थानकावर देखील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार ( Metro News) करू शकतात.”