Metro News: पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता

947 कोटींचा खर्च, तीन स्थानके असणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्रमांक 1 ए या उन्नत मेट्रो मार्गिकेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 946 कोटी 73 लाख एवढा खर्च येणार आहे. या मार्गिकेची लांबी 4.41 किलो मीटर इतकी असून यात 3 स्थानके आहेत.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून ही अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येईल. यासाठी 946 कोटी 73 लाख एवढा खर्च येणार असून राज्य शासनावर 170 कोटी 3 लाख इतका खर्चाचा भार असेल. या मार्गिकेची लांबी 4.41 किलो मीटर इतकी असून यात 3 स्थानके आहेत.

या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन या विशेष वहन हेतू (एसपीव्ही) मार्फत करण्यात येईल. यासाठी केंद्र शासनाचे एकूण खर्चाच्या 10 टक्के सहभाग असून कर्जाच्या स्वरुपात देखील निधी उभारण्यात येणार आहे.

राज्य शासनाचा एकूण 79 कोटी 4 लाख तसेच 90 कोटी 63 लाख रुपये परतफेड करावयाचे दुय्यम कर्ज असे एकूण 170 कोटी 3 लाख असा सहभाग असेल. निगडी ते स्वारगेट मार्गिकेसाठी 2023 मध्ये 4.95 लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक होईल असा अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.