Metro News : मेट्रोची ‘ती’ स्थानके सुरक्षित; सीओईपी कडून महामेट्रोकडे ऑडीटचा अहवाल सादर

एमपीसी न्यूज – वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गावरील (Metro News) मेट्रोमार्ग आणि चारही स्थानके सुरक्षित असल्याचा स्ट्रक्चरल ऑडीटचा अंतिम अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) महामेट्रोला दिला आहे.

मेट्रो रेल्वे स्थानकांवर काही त्रुटी असल्याचे पत्र काही अभियंत्यांनी महामेट्रोला दिले होते. तसेच याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली होती. त्या निकालात उच्च न्यायालयाने सीओईपी कडून संबंधित मेट्रो मार्ग आणि स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्याचे आदेश दिले होते.

Mahavitaran : महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार

मेट्रोने त्यावर त्वरित कार्यवाही करत सीओईपीची मेट्रो स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंबंधी नेमणूक केली. त्याबरोबरच मेट्रो स्थानकांच्या सर्व त्रुटी निरसनाचे काम पूर्ण केले. गुरुवरी (दि. 25) सीओईपीकडून मेट्रो स्थानकांचा स्ट्रक्चरल पाहणीचा अंतिम अहवाल मेट्रोला देण्यात आला.

अहवालात मेट्रोची स्थानके सुरक्षित आहेत. स्थानकांना भेट देऊन त्यांचे निरीक्षण करण्यात आले. तसेच मेट्रो स्थानकांच्या संरचनेचे विश्लेषण करून त्यांची भूकंप विरोधक क्षमता देखील पडताळण्यात आली. त्यामध्ये असे निदर्शनास आले आहे की, मेट्रो स्थानकांची पर्याप्त सुरक्षाद्वारे आखणी करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले (Metro News) आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.