Pune : छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्थानक शिंदेशाही पगडीच्या आकारात

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या छत्रपती संभाजी महाराज उद्याना जवळच्या स्थानक सिमेंटची भली मोठी शिंदेशाही पगडीच्या आकारात बनवण्यात येणार आहे. तसेच दोन तसेच मोठे आकर्षक असे पादचारी पूल आणि जोडीला नदीच्या बरोबर कडेने एक फिरण्याचा पूलचे  काम सुरू झाले असून अन्य स्थानकांचीही कामे लवकरच सुरू होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे वास्तुविशारद हाफिज यांनी मेट्रोसाठी ही स्थानकांची आरेखने केली आहेत. त्यातील या स्थानकाला  शिंदेशाही पगडीचा लूक देण्यात आला आहे. ही पगडी सिमेंटमध्ये तयार  केली जाणार आहे.  त्याची रुंदी १४० मीटर असेल व ते तीन मजली असेल. त्यात अत्याधुनिक साधनसुविधा असतील. प्रवाशांना सोयीचे असेच ते तयार केलेले असले. दिव्यांगांसाठीही त्यात खास सुविधा असणार आहेत.  अशी माहिती वनाज ते रामवाडी या मार्गाचे प्रकल्प अभियंता अतूल गाडगीळ यांनी ही माहिती दिली.

या स्थानकापासून जंगली महाराज रस्त्यावर प्रवेशद्वार असलेले दोन मोठे पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत.  जमीनीपासून पाच मीटर अंतरावर हे पूल असतील. ते संपुर्ण स्टिलपासून तयार करण्यात येणार आहेत. एका पुलाचे प्रवेशद्वार जंगली महाराज रस्त्यावरील महापालिकेच्या मल्टीस्टोरेज पार्किंगजवळ असेल.  दुसऱ्या पुलाचे प्रवेशद्वार झाशीची राणीच्या पुतळ्याच्या मागे असेल. या पुलांवरून मेट्रोच्या स्थानकापर्यंत जाता येईल. आकर्षक रचना करून पूल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी एकाही वृक्षाची तोड होणार नाही. पुलावर त्याच वृक्षांचे छत असेल. जिथे ते नसेल तिथे कृत्रीम छत तयार केले जाईल. पुलांवर चढण्या उतरण्यासाठी म्हणून सरकते जिने तसेच लिफ्टही असणार आहे.
कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळून मेट्रोचा नदीपात्रात प्रवेश होणार आहे. तिथून ती थेट महापालिकेजवळच्या वृद्धेश्वर मंदिराजवळ नदीपात्रातून बाहेर येईल. नदीपात्रातील या संपुर्ण मार्गावर मेट्रोच्या बरोबर खालील बाजूस व नदीपात्रापासून वराच वर रिव्हर फ्रंट फूटओव्हर ब्रीज तयार करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.