Pune : मेट्रो ट्रेनचे पुण्यात लवकरच आगमन

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरु असून आज नागपूरहून मेट्रो ट्रेनचे दोन संच पुण्याला निघाले आहेत. नागपूरहून रोडद्वारे मोठ्या ट्रकमध्ये लादून हे ट्रेन संच पुण्यासाठी निघाले आहेत. ते २८ व २९ या तारखेला हे दोन्ही ट्रेन संच पुण्यात दाखल होतील. 

प्रत्येक ट्रेन संचामध्ये तीन कोच असणार आहेत. एका ट्रेनमध्ये ९५०-९७० प्रवासी प्रवास करू शकतात. मेट्रो ट्रेनचे तीन कोच पैकी एक कोच महिलांसाठी राखीव असेल. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित असून त्यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

हे तीनही डबे एकमेकांना जोडलेले असणार आहेत. त्यामुळे प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये सहजगत्या जाऊ शकतील. हे ट्रेन संच पूर्णतः स्टेनलेस स्टील या धातूपासून बनविले आहेत. वजनाला हलके असलेल्या या ट्रेन संचामध्ये अत्याधुनिक एलईडी प्रकारचे दीवे लावलेले असून बाह्यप्रकाशाच्या तीव्रतेचे आतील दीवे आपोआप कमी अधिक तीव्र करण्याची यंत्रणा यात आहे. या ट्रेनचा अधिकतम वेग ९० किमी असणार आहे. या ट्रेनमध्ये मोबाईल, लॅपटॉप, चार्जिंग सुविधा असून प्रवाशांसाठी दृक श्राव्य सूचनाप्रणाली असणार आहे.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की “लवकरच मेट्रो ट्रेन मेट्रोच्या उन्नत मार्गावर चढविण्यात येतील व मेट्रो ट्रेन धावण्याच्या चाचण्या सूरू करण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.