Pune Metro : मेट्रो धावणार आता हडपसर, पुलगेटपर्यंत

एमपीसी न्यूज – पीएमआरडीए आणि महमेट्रोकडून 43 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३ किलोमीटर लांबीच्या मार्गासह एकूण 66 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण होणार आहे. त्यामध्ये खडकवासला ते स्वारगेट, हडपसर ते सासवड आणि स्वारगेट ते रेसकोर्स या मेट्रो (Pune Metro) मार्गांचा समावेश आहे.

Education : दहावीनंतरच्या – पंचतारांकित संधी!

पिंपरी – चिंचवड ते स्वारगेटच्या मेट्रो (Pune Metro) प्रकल्पाचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे तर हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. त्याशिवाय खडकवासला ते खराडी हा 28 किलोमीटरचा मार्ग होणार आहे. विस्तारीत मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. महामेट्रोचा (Pune Metro) खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट – हडपसर फाटा ते खराडी असा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.