Pune : एनजीटीचा निकाल जाहीर; नदीपात्रातूनही धावणार मेट्रो

हा निर्णय पर्यावरण विरोधी – असीम सरोदे

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोबाबत दिल्ली येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) सुरू असलेला खटल्याचा निकाल आज जाहीर झाला असून नदी पात्रातील मेट्रो रस्त्याला राष्ट्रीय हरित न्यायाधिकाराची काही अटींच्या आधारे परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून नदीपात्रातूनही मेट्रो धावताना दिसणार आहे. 

मात्र पुणे मेट्रोच्या नदीपात्रामधून जात असलेल्या मार्गाला शहरातील पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. दरम्यान, हा निर्णय पर्यावरण विरोधी असून आम्हाला मान्य नसल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्त्यांचे वकील असीम सरोदे यांनी नोंदवली.

नदीपात्रातील मार्गाला विरोध करीत उद्योगपती अनू आगा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, आरती किर्लोस्कर आणि अ‍ॅड. सारंग यादवाडकर यांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.