Pune : मेट्रोच्या ट्रॅफिक वॉर्डनचा ट्रकच्या धडकेने मृत्यू

एमपीसी न्यूज – वनाज – रामवाडी मेट्रो मार्गावर राजा मोतीलाल मिल बहादूर रस्त्यावर शेरेटॉन हॉटेल समोर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामा दरम्यान एका ट्रॅफिक वॉर्डनला खासगी ट्रकने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ही घटना घडली. याबाबत मेट्रो प्रशासनाने चौकशी सुरू केली असून बंडगार्डन पोलीस घटनास्थळी पोचले आहेत. त्यांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटना घडली तेव्हा संबंधित मजूर कामावर नव्हता तर पगार घेण्यासाठी साइटवर आला होता, अशी माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.