Mhalunge : किरकोळ भांडणातून दुचाकी पेटवली

एमपीसी न्यूज- किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून एकाने दुचाकी पेटवून नुकसान केले. मंगळवारी (दि.२६) दुपारी एकच्या सुमारास म्हाळुंगे परिसरात ही घटना घडली.

या प्रकरणी आकाश राजेशब मुंढे (वय २३,रा.म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली असून साईनाथ महादेव पानगटकर (वय २४,रा.महादेव मंदिराच्या मागे, म्हाळुंगे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहतात. त्यांची मंगळवारी सकाळी किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्यावेळी पानगटकर याने शिवीगाळ करत तुझी गाडी मी ठेवत नाही असा दम दिला होता. दरम्यान दुपारी एकच्या सुमारास पानगटकर याने मुंढे यांची होंडा शाईन दुचाकी पेटवून दिली. पोलीस उपनिरक्षक गिरीश चामले अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.